महावितरणच्या भांडूप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम
ठाणे : वीजवाहिनी वरील हानी कमी करण्यासाठी तसेच प्रामाणिक ग्राहकांना वीजचोरांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी महावितरणच्या भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भांडूप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेत, सप्टेंबर महिन्यापासून ते आतापर्यंत वीजचोरी करणाऱ्या ३३३ वीजचोरांविरुद्ध कारवाई करून जवळपास २ कोटी ४५ लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे.
महावितरण आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. महावितरणचे कर्मचारी उन, पाऊस, वाऱ्यात काम करत असतात. ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरविण्यासाठी झटत असतात . परंतु, अशा बेकायदेशीररित्या वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांमुळे अधिकारी, कर्मचारी तसेच प्रामाणिक ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. ऐन दिवाळीच्या काळात आपल्याला अंधारात जावा लागू नये तसेच आपल्या विरुद्ध कारवाई होऊ नये म्हणून ग्राहकांनी प्रामाणिकपणे विचेजा वापर करावा. भांडूप परिमंडलातील ठाणे, वाशी व पेण या मंडळ कार्यालयांतर्गत गेल्या महिनाभरापासून वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम सुरु आहे. ही मोहीम अधिक तीव्र होणार असून ठाणे, वाशी व पेण मंडळात; अधीक्षक अभियंत्यांनी सप्टेंबर पासून ३३३ जणांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. त्यातील १८४ प्रकरणात वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ नुसार ११७.७ लाखाची तर ८२ प्रकरणात कलम १२६ नुसार १०५.१७ लाखाची वीजचोरी पकडली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी मीटरशी छेडछाड करणे किंवा मीटर बायपास करणे आढळून आले आहेत. या शिवाय वीजतारांवर थेट आकडे टाकून २२.०९ लाखाची वीजचोरीचे ६७ प्रकरण उघकीस आले आहेत.
महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी वीजचोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा देऊन सर्व ग्राहकांना प्रामाणिकपणे वीज जोडणी घेऊन वीज वापर करण्याचे आवाहन केले असून ग्राहकांनी नियमितपणे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे विनंती केली आहे.
3,177,740 total views, 516 views today