रिक्षा टॅक्सी कारवाईसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करा -सचिन शिंदे

रिक्षाचा परवाना देताना सर्व कागदपत्रे घेऊन परवाने दिले जातात मात्र जो रिक्षा चालक आहे त्याची कोणतीच माहिती सरकारकडे नसते फक्त वाहक परवाना बघितला जातो,तो देशभरातील कुठलाही असू शकतो त्यामुळे जो महाराष्ट्रात रिक्षा चालवतो त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याला परवाना देण्यासाठी या यंत्रणेला अधिकार देण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

ठाणे : सात वर्षांपूर्वी रिक्षाचालकांच्या गैरवर्तणुकीमुळे स्वप्नाली लाड या इंजिनिअर युवतीला रिक्षातून उडी मारून आपला जीव वाचवावा लागला होता आणि या प्रकरणामुळे ठाण्यातील रिक्षा चालकांची मुजोरी देशपातळीवर चव्हाट्यावर आली होती,त्यानंतरही अशाच काही घटना उघडकीस आल्या मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई देखील केली जाते मात्र असे गैरवर्तणूक आणि मुजोरीचे प्रकार कमी होताना दिसत नाहीत.शुक्रवारी ठाणे रेल्वे स्टेशन ते जिल्हा परिषद या दरम्यान एका विदयार्थिनींशी गैरवर्तन करत तिला  एका रिक्षा चालकाने फ़रफ़टत नेल्याचे उघडकीस आल्याने या व्यवसायातील गुंडगिरी पुन्हा उघड झाली आहे,कालही अशीच घटना ठाण्यात झालेली आहे.विशेष म्हणजे ज्याने हा प्रकार केला तोही परप्रांतीय असल्याने रिक्षा व्यवसायाला परवानगी देताना काही नवे नियम तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे तसेच याबाबत कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व जिल्हा इंटक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी राज्यसरकारकडे केली आहे.
मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी सक्षम आणि एकमेव यंत्रणा नसल्याचे चित्र आहे.भाडे नाकारणे,महिला ग्राहकांना अश्लील हावभाव करणे,हुज्जत घालणे,दमदाटी करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.मात्र याची तक्रार वाहतूक पोलिसांना करायची कि वाहतूक विभागाला करायची याबाबत ग्राहकांना निश्चित माहिती मिळत नाही त्यामुळे याबाबत एकमेव अशी सक्षम यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे.विशेष म्हणजे रिक्षाचा परवाना देताना सर्व कागदपत्रे घेऊन परवाने दिले जातात मात्र जो रिक्षा चालक आहे त्याची कोणतीच माहिती सरकारकडे नसते फक्त वाहक परवाना बघितला जातो,तो देशभरातील कुठलाही असू शकतो त्यामुळे जो महाराष्ट्रात रिक्षा चालवतो त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याला परवाना देण्यासाठी या यंत्रणेला अधिकार द्यायला हवेत अशी शिंदे यांची मागणी असून असे पत्र ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेले आहे.

 22,136 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.