भारत न्यूझीलंडकडून २० धावांनी पराभूत

इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा

सिडनी : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (WICF) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंडने भारताला २० धावांनी पराभूत केले. आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ७२ धावा केल्या तर भारत हे आव्हान सहज पेलेल असे वाटत असताना न्यूझीलंडच्या गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी अतिशय उत्तम अशी कामगिरी करत भारताला ५२ धावांत गुंडाळून २० धावांनी विजय मिळवला.
भारताच्या पहिल्या तीन जोड्यांनी ६० धावांची भर घालून विजय दृष्टिपथात आणून दिला होता. पण शेवटच्या जोडीला दबावाखाली चांगली कामगिरी न करता आल्याने भारताला पराभव पत्करावा लागला.
१६ षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडच्या चारही जोड्यांना भारताने अनुक्रमे १३, १७, १७ व २५ धावांवर रोखल. त्यावेळी हा सामना सुध्दा भारत जिंकेल असे वाटत होते. त्यानुसार भारताने सुरवात सुध्दा जोरदार करत पहिल्या तीन जोड्यंनी अनुक्रमे १३, १८, व २९ धावा करत सामन्यात जोरदार मुसंडी मारली होती. १३ व्या ओव्हर मध्ये शेवटच्या जोडीने एक धाव काढली पण एक फलंदाज बाद झाला (-५ धावा) . १४ व्या ओव्हर मध्ये सुध्दा एक फलंदाज बाद झाला त्यामुळे त्या ओव्हर मध्ये ११ धावा काढूनही ६ धावाच फलकावर लागल्या. १५ व्या ओव्हर मध्ये ४ धावा केल्या तर एक फलंदाज बाद झाला त्यामुळे धावफलकावर या जोडीच्या वजा १ धावच लागली. तर शेवटच्या म्हणजे १६ व्या ओव्हर मध्ये ६ धावा केल्या व फलंदाज तीन वेळा बाद झाल्याने वजा ९ धावा झाल्या त्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला. अशा प्रकारे शेवटच्या जोडीने हाणामारी करताना वजा ८ धावा केल्याने भारताला ५२ धवांपर्यंतच मजल मारता आली.
न्यूझीलंडच्या पहिल्या जोडीमधील मॅट लॅथन (३) व कायरेन बटलर (१०), दुसऱ्या जोडीमधील डिऑन जॉईल (९) व स्टॅकी हँडमन (८), तिसऱ्या जोडीतील एम. गार्डनर (६), व सी. पेरेट्ट (११) तर शेवटच्या जोडीतील डि. क्रूक (१४) व टी. वॉटसन (११) यांनी विजय खेचून आणला. तर भारता तर्फे पहिल्या जोडीने दैविक राय (४) व धनुश भास्कर (९) यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरवतींनंतर दुसऱ्याच्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (११) व सुरज रेड्डी (७) तिसऱ्या जोडीतील नामशीद व्हि. (९) व मोहसिन नादाम्मल (२०) तर चौथ्या व शेवटच्या जोडीतील यतीश चणप्पा (-९) व रुमान चौधरी (१) यांनी भारतासाठी जोरदार लढत दिली.
या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी १६ षटकात न्यूझीलंडचे एकूण ६ वेळा फलंदाज बाद केले त्यामुळे न्यूझीलंडच्या ३० धावा कमी झाल्या तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही १६ षटकात भारताचे एकूण १० वेळा फलंदाज बाद केले त्यामुळे भारताच्या ५० धावा कमी झाल्या. त्यामुळेच भारताने हा सामना गमावला. या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार भरताच्या मोहसिन नादाम्मलला देऊन गौरवण्यात आले.

 258 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.