…अन्यथा न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल

शिवसैनिकांवर होणाऱ्या दडपशाहीला आळा घालण्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त जयदीप सिंग यांना पत्राद्वारे निवेदन

ठाणे : गेल्या तीन महिन्यापासून पक्षाशी गद्दारी करून झालेल्या सत्ता पलटीमुळे ठाण्यातील राजकीय मंडळी ठाणे जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर व शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून अडकविण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने आज ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेऊन पत्राद्वारे न्यायासाठी निवेदन देण्यात आले. त्यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे, ठाणे जिल्हा प्रमुख व महिला आघाडी समिधाताई मोहिते, महिला उप जिल्हा प्रमुख रेखा खोपकर, महेश्वरी संजय तरे, युवा अधिकारी किरण जाधव  व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या पत्रामध्ये १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री म्हणजे १५ ऑगस्ट च्या प्रारंभी तलावपाली येथील मध्यवर्ती शाखेमध्ये ध्वजारोहणाचा सोहळा गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार यावर्षीही असंख्य निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पोहोचविले असताना फुटीर गटाकडून चितावणी होत असताना सुद्धा आम्ही संयम दाखवल्यामुळे आणि कायदा सुव्यवस्थेची जाण ठेवून संघर्ष टाळला.
त्यानंतर मनोरमा नगर येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या वाचनालयाचे नामफलक काढून शिंदे गटाचा नामफलक लावला जबरदस्तीने वाचनालयाची जागा बळकवण्याचा प्रयत्न केला तेथेही आम्ही संयम सोडला नाही.
तसेच ५ ऑक्टोंबर शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यास पक्षाचा जय जयकार करत घोषणा देत शिस्तीने ठाणे रेल्वे स्थानकात जात असताना ७७ वर्षाचे निवृत्त शासकीय अधिकारी शंकर गणपत शिंदे त्यांच्यासह १३ ते १४ जणांवर गुन्हा दाखल करून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनाच आज १३ ऑक्टोबर रोजी भल्या सकाळी चाप्टर केस भरल्याच्या नोटीसा देण्यात आल्या.
चेंदणी कोळीवाडा या भागातील गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणारी शिवसेनेची शाखा शिंदे गटाकडून दुरुस्ती च्या नावाखाली बळकविण्याचा प्रयत्न करीत असताना सुद्धा अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळून घेतली.
९ ऑक्टोंबर रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून करण्यात आली त्यावेळी गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे शिवसेने नेते भास्कर जाधव साहेब, खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, अनिताताई बिर्जे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, धर्मराज पक्षाचे व कामगार नेते राजन राजे, सूत्रसंचालक सचिन चव्हाण यानच्या जणांवर प्रक्षोभक भाषण दिल्याचा ठपका देऊन नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले.
लोकशाहीने भाषण करण्याचा अधिकार दिला असतानाही गुन्हे दाखल होतात. परंतु आज १३ ऑक्टोबर  रोजी किसन नगर शाखेच्या बाहेर निशाणीच्या नावावर ढालीतून नंग्या तलवारी फिरवल्या हे कोणत्या कायद्यात बसत ? आणि त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाहीत ? हा पक्षपात आम्ही सहन करणार नाही. न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेत. असे शिष्टमंडळाने ठणकावून सांगितले.
एवढ्यावरच थांबले नसून येणाऱ्या सनासुदीच्या ऐन दिवाळीला सगळीकडे आनंदमय वातावरण असताना दिवाळीमध्ये देखील खोडा घालण्याचा प्रयत्न शिंदे गट करीत आहेत.
मासुंदा येथील राजवंत ज्वेलर्स समोर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गेल्या १० वर्षापासून दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करीत असताना यावर्षीही महापालिकेने व अग्निशामक दलाने परवानगीही दिलेली आहे. हे माहीत असून देखील शिंदे गटाकडून आम्ही दिलेल्या अर्जाच्या तारखेच्या मागील तारीख टाकून सत्तेचा दुरुपयोग करून परवानगी घेण्याचे कारस्थान ही मंडळी करीत आहेत. सदर दिवाळी पहाट हा कार्यक्रम आमची परंपरा लक्षात घेता व सदर ठिकाणावर आमचा हक्क लक्षात घेता हा न्याय आम्हाला मिळावा अशी मागणी जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने आज पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडे करण्यात आली आहे.

 20,854 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.