भगवद्गीता श्लोक पठण स्पर्धा

विविध पाच गटांमध्ये डिसेंबर महिन्यात दादर, ठाणे, बोरिवली, विलेपार्ले, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, आंबिवली व टिटवाळा या ठिकाणी होणार स्पर्धा

मुंबई : संस्कृत भाषा संस्था आणि अखिल भारतीय कीर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डिसेंबर महिन्यात विविध ठिकाणी भगवद्गीता स्पर्धा घेण्यात येते. या वर्षीही डिसेंबर महिन्यात दादर, ठाणे, बोरिवली, विलेपार्ले, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, आंबिवली व टिटवाळा या ठिकाणी भगवद्गीता श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन केले आहे.
      या स्पर्धेसाठी भगवद्गीतेचे दहाव्या अध्यायाचे विविध गटानुसार श्लोक पाठांतरास आहेत. प्रथम गट  – इ. १ ली, २ री – १० श्लोक, द्वितीय गट – इ.३री, ४थी – १५ श्लोक, तृतीय गट -५ वी ते ७ वी – २० श्लोक,चतुर्थ गट – इ. ८ वी ते १० वी व महाविद्यालयीन गट – २५ श्लोक,पंचम गट – संस्कृतप्रेमी ( खुला गट) २५ श्लोक.
प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र मिळेल. गीतेचे श्लोक पाठांतर करून सलगपणे शुद्ध व स्पष्ट म्हणून दाखवायचे आहेत. या स्पर्धेसाठी वीस रुपये शुल्क आहे. प्रत्येक केंद्रावर स्पर्धकांच्या संख्येनुसार प्रत्येक गटात बक्षीसांचे आयोजन केले आहे.
         शाळांनी या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गटवार यादी, विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव व इयत्ता हा तपशील मराठीत लिहून १५ ऑक्टोबर पर्यंत केंद्रप्रमुखाकडे द्यावी. असे संस्कृत भाषा संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा जोशी व उपाध्यक्षा उज्वला पवार यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी उज्वला पवार ९८३३१६०२२४,  मंजुषा बुरुजवाले ९८३३८५८९३० यांच्याशी संपर्क साधावा.

 2,977 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.