स्ट्रीक्स प्रोफेशनलचे ‘मर्क्युरिअल’ कलेक्शन बाजारात दाखल

अभिनेत्री मौनी रॉयच्या उपस्थितीत कलेक्शनचे अनावरण

मुंबई : स्ट्रीक्स प्रोफेशनल या विशेषत: सलून व्यावसायिक व केशभूषाकारांसाठी डिझाइन करण्यात आलेली केसांची काळजी, रंग व स्टाइलकरिता व्यावसायिक उत्पादन श्रेणीने मुंबईमध्ये आयोजित फॅशन कार्यक्रमामध्ये त्यांचे नवीन कलेक्शन मर्क्युरिअल लॉन्च केले. अभिनेत्री मौनी रॉय कलेक्शनसाठी शोस्टॉपर होत्या आणि तिने तिच्या मर्क्युरिअल स्टाइलमध्ये या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
मर्क्युरिअल म्‍हणजे आजच्या आधुनिक प्रभावांसह मोठ्या प्रमाणात फॅशन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत भडक हेअर कलरऐवजी सेंद्रिय साहित्य असलेले अत्यंत सौम्य मोनोक्रोमॅटिक क्‍लासी नॅच्युरल हेअर कलरचा वापर करणे. यामधून कट्स, ग्राफिक लाइन्स व अवरोधित रंगांनुसार कमी घडणीसह केसांना देण्यात आलेला कोमल व अधिक आकर्षक आकार प्रभावीपणे दिसून येतो. प्रदेशांमधील लोककथा/बंश व संस्कृतीचा प्रभाव अधिक सौम्य पेस्टन टोन रंग व केसांच्या कुरळेपणामधून दिसून येतो. तसेच हे कलेक्शन अपडू व स्टाइलमध्ये बांधल्या जाणाऱ्या वेण्यांसाठी देखील शोभून दिसते. या कलेक्शनमध्ये सुपरचार्ज्ड, नॅच्युरल मी आणि अदरव्हेअर या तीन घटकांचा समावेश आहे.
हायजिन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रोफेशनल डिव्हिजन (स्ट्रीक्स प्रोफेशनल)च्या प्रमुख श्रीम. रोशल छाब्रा म्हणाल्या, “क्लासिक कधीच प्रचलित होत नाही आणि ट्रेण्ड्सच्या आधुनिक विश्वामध्ये आम्ही ब्रॅण्ड म्हणून आमच्या समकालीन ग्राहकांसाठी विविध स्टाइल्स व लुक्स सानुकूल करतो. मर्क्युरिअल कलेक्शनसह आम्ही वैविध्यपूर्ण, अधिक प्रमाणातील केशभूषांऐवजी मोनोक्रॉम व स्थानिक केशभूषा प प्रिंट्सकडील परिवर्तनाला सादर करणारे ३ वैशिष्ट्यपूर्ण लक्षवधेक स्टाइल्स व लुक्स सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आमचे नवीन कलेक्शन सादर करण्याचा आनंद होत आहे. या कलेक्शनमध्ये फॅशनप्रेमींसाठी जुन्या युगाचे आकर्षण आणि आधुनिक काळातील स्टाइलचे सर्वोत्तम संयोजन आहे.’’
हे कलेक्शन कस्टमाइज्ड फॅशन डिझायनर, प्रशंसनीय अभिषेक शर्मा यांच्याकडून प्रेरित आणि क्युरेट केले गेले होते, जे क्लासिकसह समकालीनांना पूरक करण्याच्या क्षमतेसाठी लोकप्रिय आहेत. शोस्टॉपर म्हणून मौनी रॉयने नॅचरल मी झोनमधून एक स्टाइलिश मोहक लुक दाखवले, तसेच अभिषेक शर्मा यांनी डिझाइन केलेला बेस्पोक आयव्हरी गाऊन परिधान करत कॅरामल ब्राऊन हेअर कलर आणि हनी ब्राऊन हायलाइट्ससह केशभूषा दाखवली.

 171 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.