पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये यांचा युती सरकारला पाठींबा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाठींबा देण्याचा निर्णय घेतला जाहीर
मुंबई : पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच यापुढे पालघर जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिवसेनेच्या विस्तारासाठी जिल्ह्यात कार्यरत राहण्याचे निर्देश दिले.
वैभव संख्ये यांनी युती सरकारला पाठींबा देणे हा पालघर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का आहे. तर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचे हात अधिक बळकट झाले आहेत. यावेळी युवा सेनेचे विस्तारक राहुल लोंढे हेदेखील उपस्थित होते.
445 total views, 2 views today