पहिल्या स्मृतिदिनी बा. ग.चितळेसरांच्या आठवणींना मिळाला उजाळा

मो. ह. विद्यालय आणि अभिरुची मंडळ आयोजित कार्यक्रमात जागवल्या चितळे सरांच्या आठवणी, तसेच गणित स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या ५ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा करण्यात आला गौरव

ठाणे : ठाण्यातील नामांकित मो. ह. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बा. ग.चितळे यांचा पहिला स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने मो. ह. विद्यालय आणि अभिरुची मंडळाने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाळेतर्फे घेण्यात आलेल्या गणित स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या ५ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. विकास हजरनिस, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, कोषाध्यक्ष रवींद्र तामरस आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. विकास हजरनिस यांनी आपले शिक्षक चितळे सर, नि. गो. पंडितराव आणि एन. टी. केळकर या गुरुवर्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मो.ह.विद्यालयाला चांगल्या मुख्याध्यापकांची परंपरा असल्याची भावना शैलेंद्र साळवी यांनी व्यक्त केली. तर रवींद्र तामरस यांनी चितळे सरांचा दिनक्रम आणि त्यात शाळा आणि संस्थेबद्दल असणारी आत्मीयता याबद्दलचे गुणोत्तर उलगडून सांगितले. याशिवाय शाळेचे माजी शिक्षक बर्वे सर, भिडे सर, चितळे कुटूंबियांच्या वतीने मिलिंद चितळे, माजी विद्यार्थीनी शिरीष अत्रे यांनी चितळे सरांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी फाल्गुन ढोकळे यास मॅथेमॅटिक्स टॉपर म्हणून सन्मानित करण्यात आले.
सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका निलांबरी जठार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अभिरुची मंडळाच्या कार्यवाह उत्कर्षा मुणगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्नेहा शेडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे पदाधिकारी, माज़ी शिक्षक ,माज़ी विद्यार्थी, पालक विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते

 5,123 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.