कॅन्सर तज्ञ डॉ. सतीश कामत यांच्या पुढाकाराने कॅन्सर रुग्णांसमवेत रोझ डे साजरा

ठाणे, दि. 18 : प्रसिद्ध डॉक्टर, सतीश कामत, कॅन्सर तज्ञ, ठाणे आणि आशा कॅन्सर हास्पिटल व ट्रस्टचे अध्यक्ष यांनी कॅन्सर रुग्ण जे त्यांच्या उपचाराने चांगले बरे झाले आहेत त्यांच्यासमवेत रोज डे साजरा केला. सुमारे 200 रुग्ण या कार्यक्रमाला उपस्थित होते
डॉ. कामत हे रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी रोझ डे दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा करून लोकांना कन्सर हा बरा होणारा रोग आहे असा संदेश देतात.
या कार्यक्रमात सहभागी रुग्णांनी आपल्यामधील कला गायन, नाच या स्वरुपात सादर केल्या तसेच कविता डान्स अकॅडमी मधील कलाकारांनी विठ्ठल डान्स, जोगवा असे अनेक कार्यक्रम सुंदर सादर केले. या रुग्णांसाठी लकी ड्रॉ, पैठणी ड्रॉ अशा भेटी देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.
डॉ. सुनीता कामत, कवी अरुण म्हात्रे, राजेंद्र साप्ते, संजय माशाळकर हे मुख्य पाहुणे म्हणून कार्यक्रमाला लाभले आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला
नंतर रुग्णांना गुलाबपुष्प देऊन कॅन्सर विसरून तुमचा पुनर्जन्म समजा, आनंदी राहण्याची शपथ घ्या, स्वत: तरुणाईसारखे उत्साही जीवन जगा असा संदेश देण्यात आला.

 7,861 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.