जागतिक वाहन चालक सन्मान दिन शनिवार १७ सप्टेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जि.प. ठाणे येथे महाराष्ट्र राज्य शासकिय वाहन चालक कर्मचारी संघटना जिल्हा परिषद शाखा ठाणे, यांचे वतीने आयोजित करण्यात आला.
प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सदर प्रसंगी उपस्थित उप प्रादेशिक अधिकारी डॉ. विजय शेळके साहेब यांनी जि.प. वाहन चालक कर्मचारी यांना मार्गदर्शनपर भाषण केले. वाहतुकीचे नियम, वाहन चालकाची जबाबदारी, नवीन वाहने इंडीकेटर सेन्सर बाबत माहिती, अपघात, क्रॉसिंग, डांबरी व सिमेंट कॉंक्रिट रोड मधील फरक व फ्रिक्शन, दोन वाहना मधील अंतर, स्पीड कधी किती ठेवायचा अशी महत्वपुर्ण माहिती दिली, तसेच उपस्थितांना वाहना बाबत प्रश्न विचारले, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालया तर्फे सदर प्रसंगी शाल व श्रीफळ देवुन जि.प. वाहन चालकांचा सन्मान करण्यात आला.
13,256 total views, 1 views today