कळवा प्रभाग समितीतील ६ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
ठाणे – ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील ६ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.
या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समितीमधील जॅम फॅक्टरी, खारेगाव येथील स्टील्ट अधिक ६ मजली अनधिकृत इमारत तसेच जामा मशिद, कळवा नाका येथील तळ अधिक ४ मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. हिरादेवी मंदिर, खारेगाव येथील स्टील्ट अधिक ५ मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरू असून ०७ रूमच्या भिंती तोडण्यात आल्या. यासोबतच मच्छी मार्केट जवळील राज वाईन्सच्या पाठीमागे ओम मयुरेश सोसायटीची स्टील्ट अधिक ८ मजली अनधिकृत इमारतीच्या १४ रुमच्या भिंती तोडण्यात आल्या. तसेच टाकोली मोहल्ला येथील तळ अधिक ९ मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान दिवा येथे बांधण्यात आलेल्या २ चाळीमधील अनधिकृत खोल्या तोडण्यात आल्या.
सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त फारुख शेख, प्रणाली घोंगे आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.
382 total views, 2 views today