दुकानांना रात्री पर्यंत मुभा तर सर्वसामान्यांसाठी लोकल बंदच

 मुंबई – कोरोना रुग्णवाढ राज्यात कमी होत नसल्यानं राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंध अद्यापही कडक आहेत. मुंबईत देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं बंधन अद्याप आहेच. मुंबई लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु आहे. यात सर्वसामान्य लोकांकडून सर्वांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी होत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये महत्वाचं भाष्य केलं आहे. लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत,असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सांगली येथे पूर परिस्थितीची आढावा बैठक घेऊन नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होतील. 

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा  प्रभाव कमी होताना पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यात घट होत आहे. अशामध्ये आता राज्य सरकारकडून  देखील लॉकडाऊनचे  निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री लॉकडाऊनचे नियम शिथिल करणारी नवीन नियमावली जाहीर केली. हे नवीन निर्बंध सोमवारपासून म्हणजे ७ जूनपासून लागू होणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत आदेश काढला आहे. 

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉकसंदर्भात  घोषणा केली होती. त्यानंतर काही तासांत राज्य सरकारने खुलासा करत कोणतीही नियमावली जाहीर केली नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे गोंधळ उडाला होता. पण आता अनलॉकचा गोंधळ संपला असून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत.

आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेड्सचे प्रमाण आणि पॉझिटिव्ह रेट  या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील. पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्याला या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करुन नियमावलीनुसार निर्बंध शिथिल करायचे की अधिक कडक करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. एकूण ५ स्तरावर ही अंमलबजावणी होणार आहे.

सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार… 

मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. म्हणजे या महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील.

ज्या ठिकाणी ५ टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी रेट आहे आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येतील.
हा पहिला स्तर असेल.

५ टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी रेट आहे आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत. याला दुसरा स्तर असेल.

५ ते १० टक्के पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स भरलेले असतील तर याला तिसरा स्तर मानला जाईल. याठिकाणचे व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील.

१० ते २० टक्के पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स भरलेले असतील तर याला चौथा स्तर मानला जाईल. याठिकाणचे व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील. तसेच शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील.

२० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स भरलेले असतील तर याला पाचवा स्तर मानला जाईल.

पहिल्या स्तरात मोडणाऱ्या भागांमध्ये मॉल, दुकानं, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल.

 दुसऱ्या स्तरात मोडणाऱ्या भागांमध्ये मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट राहील.

तिसऱ्या स्तरात मोडणाऱ्या भागांमध्ये दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. सिनेमागृह, सभागृह, नाट्यगृह बंद राहतील.

चौथ्या स्तरात मोडणाऱ्या भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील.

पाचव्या स्तरात मोडणाऱ्या भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार, रविवार ही दुकाने बंद राहतील.

 155 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *