मुंबई लालबाग गणेश उत्सवाला राज्य सरकारच्या गाईडलाईन

मुंबई – कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त केला जात असतानाच मुंबईत यावेळी लालबागच्या राजाचा दरबार भरणार आहे. लालबागमध्ये यावर्षी गणेश उत्सवाचे आयोजन केले जाईल, ज्यासाठी राज्य सरकारने रविवारी गाईडलाईन जारी केली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, गणेश उत्सवाच्या आयोजनात कोविड प्रोटोकॉल बाबत कोणतीही शिथिलता असणार नाही.
कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षी लालबागमध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. येथे गणेश उत्सवाऐवजी ब्लड आणि प्लाझ्मा डोनेट कॅम्प लावण्यात आले होते, परंतु यावर्षी आयोजन होणार आहे. लालबागच्या राजाची ४ फुटापेक्षा उंच मूर्ती नसणार. 

सरकारच्या गाईडलाईननुसार, लालबागमध्ये श्री गणरायाची मूर्ती ४ फुटापेक्षा जास्त उंच नसेल. सोबत जे लोक घरात गणपतीची मूर्ती स्थापन करतील ते २ फुटापेक्षा जास्त उंच मूर्ती ठेवू शकत नाहीत.

याशिवाय आयोजनाच्या दरम्यान कोविड प्रोटोकॉलकडे विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. राज्य सरकारने आयोजकांना सांगितले आहे की, कोरोना संकट लक्षात घेता गणेशोत्सव एकदम साध्या पद्धतीने साजरा केला जावा. देशात गणेश उत्सवाची सुरूवात १० सप्टेंबरपासून होईल.

 269 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.