भा.ज.पा. चा पापाचा घडा भरला – नाना पटोले

भा.ज.पा.चा पापाचा घडा भरत चालला असून येत्या काही दिवसांतच ते स्पष्ट होईल-
नाना पटोले.

ठाणे – केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळेच आज सर्व सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले असून देशातील काळे धन येणार म्हणून केलेली नोटबंदी,प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख येणार म्हणुन निवडकीत दिलेले आश्वासन,२ कोटी बेरोजगार युवकांना नोकरी या सर्वच विषयावर केंद्रातील भा.ज.पा.सरकार फोल ठरली असून भारतीय जनता पार्टीचे पापाचा घडा भरत चालला लवकरच हे चित्र स्पष्ट होईल, जनताच त्यांना आता चोख उत्तर देईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी ठाण्यात व्यक्त केला.

ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने युवक नेते विनर बिंद्रा यांच्या पुढाकाराने आज ठाण्यातील कीन्नर समाजातील लोकांना जीवनावश्यक साहित्य तसेच अंपग लोकांना व्हीलचेअरेचे वाटप करण्यात येऊन लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती या कार्यक्रमात नानासाहेब पटोले यांच्यासह काॅग्रेस अध्यक्ष .विक्रांत चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते,या प्रसंगी बोलताना नानासाहेब पटोले यांनी सांगितले की यापूर्वी काॅग्रेसच्या कार्यकाळात भविष्याची तरतूद म्हणून जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत असे परतु आज बँकेच्या प्रत्येक देवाणघेवाण करण्यासाठी चार्जेस आकारण्यात येत आहेत,सरकारकडे विविध मार्गाने कररूपाने आलेला पैसा हा सर्वासाठी विविध सुविधा,मदत कार्य,देश उभारण्याकरिता वापरला जात होता पण आता केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे मूठभर धनिकाकडे हा पैसा जात असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला.ठाण्यातील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काही महत्वाचे विषय सातत्याने जनतेसमोर आणले जात असून त्याला ठाणेकर नागरीक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत,ठाणे काँग्रेसमधील काही संघटनात्मक बदल आपल्याला येत्या काही दिवसांतच दिसतील असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.केंद्रातील सरकारच्या निर्देशानुसारच अनेक चुकीच्या प्रकारच्या चौकश्या केला जात असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

 307 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *