एका वर्षाच्या नायझेरिअन मुलीवर यशस्वी हृदय-शस्त्रक्रिया

वाडिया रुग्णालयातील शस्त्रक्रिया तज्ञ  डाॅ. बिस्वास पांडा यांनी केली यशस्वी  हृदय-शस्त्रक्रिया   

मुंबई – कंजेनायटल नावाचा हृदयाचा आजार जगभरातील नवजात बाळांमध्ये केवळ एक टक्के होतो. त्यातील सत्तर टक्के प्रकरणे ह्रदयाच्या साध्या वन-टाइम शस्त्रक्रियेद्वारे सोडविली जातात.  पण
आश्चर्यकारकरित्या नायजेरिया मध्ये दरवर्षी जन्म घेणा-या सुमारे सात दशलक्ष बाळांपैकी छप्पन्न
हजार या विकाराने ग्रासलेले असतात. ज्यांना  हृदय-शस्त्रक्रियेसाठी भारतासह इतर देशांमध्ये उपचार घेण्याचा सल्ला देवून पाठविले जातात.  कारण नायजेरिया मध्ये ही सुविधा नाहीच ! अशीच एका लहानग्या नायजेरिअन मुलीवर २७ जुलै रोजी परळ येथील वाडिया रुग्णालयात यशस्वीपणे ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. विश्वास पांडा यांनी केली.

 सुप्रसिद्ध वुमंस राईट्स एक्टिव्हीस्ट, रोटरी क्लब ऑफ मुंबई एसेसच्या सदस्या व अखिल भारतिय
अग्रवाल संमेलन या संस्थेच्या राष्ट्रिय चिटणीस .सुमन अग्रवाल यांच्या सहकार्याने या बाळाच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्यात आला.  एम्मा नावाच्या या  एका वर्षाच्या मुलीवर करण्यात आलेली ही हृदय-शस्त्रक्रिया या रुग्णालयात झालेली नायजेरियन बाळांची अशी दुसरी शस्त्रक्रिया आहे. 

रोटरी क्लब ऑफ मुंबईच्या आर्थिक मदतीने करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान सुमन अग्रवाल ह्या रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ.राजेंद्र अग्रवाल, चिफ को-ऑर्डिनेटर लिना शहा, असिस्टंट गव्हर्नर दिपा गोयनका इत्यादी सहका-यांसह रुग्णालयात उपस्थित होत्या. एम्माबरोबर नायजेरियातून तिच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आली तिची आईही सदरप्रसंगी होतीच.

 276 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.