शहरातील ४ अनधिकृत बांधकामे निष्कासीत महापालिकेची धडक कारवाई

ठाणे – शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईतंर्गत आज कळवा आणि माजीवडा-मानपाडा समितीमधील ४ अनधिकृत बांधकामे जेसीबी व मनुष्यबळाच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली.

या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समितीमधील भुसार अळी आणि कुंभार अळी येथील दोन अनधिकृत तळ अधिक ८ मजल्याच्या इमारतीतील १४ खोल्यांचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील बाळकूम पाडा नं.१ येथील स्टील्ट + ६ मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई करून इमारतीचे ३ मजले व २४ खोल्यांचे बांधकाम तोडण्यात आले.तर वर्तकनगर प्रभाग समितीममधील उपवन येथील स्काईनलाईन हुक्का पार्लर आणि येऊर येथील शामियाना हॉटेलचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले.

 सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निष्कासनचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, कल्पिता पिंपळे आणि सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

 51 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *