ठाणे – नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे कोकणची वाताहत झाली आहे. अनेकांचे घर उध्वस्थ होऊन त्यांच्या नित्य गरजा भागवणेही शक्य होत नाहीत. या उध्वस्थ कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी आपले कर्तव्य म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी जशी होईल तशी मदत करावी असे आवाहन कोकण मिशन तर्फे करण्यात आले आहे.
कोकणातील पूरग्रस्तांसाठी ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथे मदत गोळा करण्यात येणार आहे.
यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे.
१. रेडी टु इट फूड ( तयार अन्न पदार्थ) २. कोरडे धान्य. ( भात, गहू, साखर इत्यादी) ३. माचिस व मेणबत्ती ४. ओडॉमोस ५. मच्छर पळवण्यासाठी कोईल ६. भांडी घासण्यासाठी लिक्वीड ७. साबण ८. बाथरूम स्वच्छ करण्यासाठी लिक्वीड, हार्पिक ९. ऑईल, तेल १०. बाळांसाठी व लहान मुलांसाठी कपडे ११. पुरुष व स्त्रियांसाठी अंतर्वस्त्रे ( नवीन) १२. दात घासण्यासाठी ब्रश.१३. चादर + पांघरूण १४. डेटॉल १५. चप्पल १६. चहा पावडर १७. दूध पावडर १८. सॅनिटरी पेड्स १९. फेस मास्क २० सेनीटायझर २१. पिण्याचे पाणी. २२. झाडू आणि खराटा
मदतीसाठी दीपेश दळवी : +91 80808 22258 यांच्याकडे संपर्क साधावा.
हि मोहीम प्रज्ञा म्हात्रे, मानसी प्रधान – कमलेश प्रधान, विकास धनवडे, निशांत बंगेरा, अजय भोसले, दीपेश दळवी यांनी हाती घेतली आहे. बुधवारपर्यंत मदत स्वीकारली जाईल.
शुक्रवारी ही मदत घेऊन कोकणात रवाना होणार आहे. आपण जास्तीत जास्त प्रमाणात मदत करून सहकार्य करावे.
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ५. स्थळ : ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे
623 total views, 1 views today