मध्य रेल्वेच्या तिमाही कामगिरीचा महाव्यवस्थापक मध्य रेल्वेचा आढावा

मुंबई –  मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल  यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीत कामगिरी आढावा बैठक घेतली.  आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीतील विविध प्रमुख बाबींचा  विभागनिहाय कामगिरीच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.  

संरक्षा, मालवाहतूक, बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स, मोबिलिटी, उत्पन्न, मानव संसाधन इत्यादींशी संबंधित मुख्य मुद्द्यांवर कामगिरी आढावा बैठकीत सविस्तरपणे माहिती घेण्यात आली.  विविध पॅरामीटर्स आणि त्यासाठी नेमलेले लक्ष  याची सध्यस्थिती अहवाल आणि हे  लक्ष साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या भावी कृती आणि आणखी   चांगली कामगिरी सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांविषयीही चर्चा करण्यात आली.

मागील वर्षातील कामगिरीचे सादरीकरण तसेच सध्याच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारे सादरीकरणासह उद्दिष्टे साध्य करण्यासाठी  विभागांचे प्रधान विभागाध्यक्ष (पीएचओडी) आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांनी कृती योजना सादर केली.

 कंसल यांनी कोविड समस्या असूनही एप्रिल – जून २१०१ दरम्यान केलेल्या मालवाहतुकीच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.  महाव्यवस्थापकांनी टर्मिनल अडथळ्यांचे निरीक्षण करणे आणि त्यातील अडचणी ओळखण्याची गरज यावर भर दिला.  त्यांनी व्यवसाय विकास युनिट्सना नवीन ग्राहक आकर्षित करून मालवाहतूक वाढीस चालना देण्यास सांगितले आणि विभागीय प्रमुखांना नवीन वाहतूक आकर्षित करण्यासाठी भागधारकांसोबत कृतीशील पणे भेटी आयोजित करण्यास सांगितले.  विविध विभागातील अडचणी ओळखून त्यावर वेळेत मात करण्यासाठी त्यांची कालबद्ध योजना आखण्यासही त्यांनी विभागांना सांगितले. त्यांनी  दररोज उत्पन्नावर लक्ष ठेवण्यासाठी उद्युक्त केले आणि  “एका पैशाची बचत म्हणजेच एक पैसा कमावणे आहे” या मंत्राचे अनुसरण करण्यास सांगितले.

कंसल म्हणाले की,  सुरक्षा ही नेहमीच सर्वोपरि आहे.  शून्य मृत्यूची मोहीम साध्य करण्यासाठी व खात्री करुन घेण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली.  आरओबी / आरयूबी (रस्ते पूल)  बांधणे, मानव संचलित लेव्हल क्रॉसिंगचे निर्मूलन आणि डायव्हर्शनद्वारे लेव्हल क्रॉसिंग बंद करणे किंवा थेट बंद करणे यासारख्या सुरक्षिततेशी संबंधित कामांना गती देण्यावरही चर्चा झाली.  आर.यू.बी. मध्ये पाणी साठण्याच्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि भविष्यातील बांधकामांमध्ये अंगभूत नाल्यांचे डिझाइन केलेले असावे असेही त्यांनी सांगितले.

नवीन रेल्वे मार्गाचे बांधकाम, दुहेरीकरण, विद्युतीकरण इ. सारख्या पायाभूत सुविधा आघाडीवर त्यांनी मत मांडले की,  निर्धारित कालावधीत कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विभागीय रेल्वेनी बांधकाम  विभागासह परिचालन विभागाशी  समन्वय साधून सक्षमपणे कार्यवाही करावी.  त्यांनी सूचना केली की, काहीही विद्युतीकरणासाठी शिल्लक ठेवू नये.  त्यांनी आपले स्वतःचे लक्ष्य ठरविण्यास आणि त्यास प्राधान्य देण्याचा मंत्र दिला.

कंसल यांनी ई-ऑफिसच्या वापरावर, मानव संसाधनाशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे, प्राधान्यक्रमावरील वेगातील अडथळे दूर करणे यावर भर  दिला.

या बैठकीला अतिरिक्त महाव्यवस्थापक, विभागांचे प्रधान विभागाध्यक्ष, मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सर्व कोविड -१९ अनिवार्य प्रोटोकॉल पाळले गेले.

 281 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.