ठाणे – ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली.
कळवा प्रभाग समितीमधील जॅम कंपनी, खारेगाव येथील अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.
526 total views, 1 views today