शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचा छापा

मुंबई – राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. राज विरोधात सतत विविध पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान राजला आणखी एक धक्का देण्यात आला. त्याची पत्नी शिल्पा शेट्टीच्या घरात क्राईम ब्रांचने छापेमारी केली आहे. या छापेमारीत पोलिसांच्या हाती काय लागलं याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु पोलीस त्याच्या पॉर्नोग्राफी व्यवसायाबद्दल माहिती देणारे काही दस्ताऐवज शोधत आहेत. सोबत ते राज कुंद्राला देखील त्याच्या घरी घेऊन आले आहेत. 

राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच  कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे. दरम्यान अशाच काही ग्रुप्स ची माहिती न्यूज 18 च्या हाती लागली आहे. ज्यादिवशी शुट केलं जायचं त्यादिवशी नवा ग्रुप बनवला जाई व आर्टिस्ट न्यूड असं नाव दिलं जाई. फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा गहना वशिष्ठ समवेत काहींना अटक करण्यात आली होती.

 403 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *