ठाणे रेल्वे स्टेशन सुधार कामासाठी आमदार संजय केळकर यांचा पुढाकार

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन दिला प्रस्ताव.. अधिवेशनानंतर ठाणे शहराला भेट देण्याचे मंत्रीमहोदयांचे आश्वासन

ठाणे – ठाणे शहरातील रेल्वे स्टेशन आणि कोकण रेल्वे चे विविध प्रलंबित असलेले  विषय याबाबतीत आमदार संजय केळकर यांनी नुकतीच नव्यानेच पदभार संभाळले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दील्ली तील निवास्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन चे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील व ज्ञानदीप जाधव उपस्थित होते. 

गणपती गणेश चतुर्थी आणि होळी यासारख्या कोकणातल्या मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या सण उत्सवासाठी पुरेशा जादा गाड्यांची व्यवस्था, कोकणातील साऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये चांगल्या प्रकारे खानपान व्यवस्था, त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्टेशन वरील भविष्यातील आवश्यक असणाऱ्या विविध सुधारणा तसेच प्रवाशांच्या वेगवेगळ्या समस्या, कल्याण – डोंबिवली पुढील चौथ्या – पाचव्या मार्गी करण बाबत, आशा अनेक विषयांवर  मंत्रीमहोदयांशी सर्विस्तर चर्चा केली. वरील सर्व बाबींविषयी अधिवेशनानंतर ठाणे शहराला रेल्वे विषयी समस्यांबाबत भेट देऊन आढावा घेतला जाईल व त्याचबरोबर कोकणात जाण्यासाठी आणखीन किती जादा गाड्यांची आवश्यकता आहे याची सविस्तर माहिती मागविली असून आवश्यकतेप्रमाणे कोकणातील सण उत्सवासाठी गाड्यांची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिलेले आहे.

 335 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.