वीजचोरी प्रकरणी ठाणे वर्तकनगर येथील उद्योजकावर गुन्हा दाखल

१,३५,४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रुपयांची वीज चोरी उघडकीस 

मुंबई – वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून विजेची चोरी करणाऱ्या ठाणे वर्तकनगर येथील उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १,३५,४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळून आले आहे.

महावितरणच्या भांडूप नागरी परिमंडलांतर्गत येत असलेल्या ठाणे येथील शिवाईनगर शाखा लोकमान्य नगर उपविभागात इंडिअन टेक्निकल वर्क्स ही कंपनी आहे. दिनांक १० जुलै २०२१ रोजी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, लोकमान्यनगर, नारायण सोनावणे, सहाय्यक अभियंता शिवाईनगर  धनाजी पुकळे सोबत वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप मंडावळे यांच्यासोबत तपासणी केली असता सदर मीटरमध्ये फेरफार असल्याचे संशय आल्यामुळे ग्राहक प्रतिनिधीच्या समवेत दि. १२ जुलै २०२१ रोजी पंचांसमोर सील उघडून तपासणी करताना वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून विजेची चोरी करीत असल्याचे समोर आले. सदर ग्राहकाने १,३५,४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रुपयांची अनधिकृत वीज वापरल्यामुळे वीज अधिनियम २००३ मधील कलम १३५ नुसार दि. १९ जुलै २०२१ रोजी इंडिअन टेक्निकल वर्क्सचा मालक अजमल जमाल सय्यद याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामध्ये ठाणे वर्तकनगर पोलीस ठाणे तर्फे पुढील तपास सुरु आहे.

भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ही वीजचोरी पकडल्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. वीज चोरी ही एक किड आहे. वीज चोरी केल्यास महावितरण सोबतच प्रामाणिकपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकांचाही  नुकसान होतो. ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य अभियंता गणेशकर ग्राहकांना दिला. तसेच, ग्राहकांनी आपले वीजबिल नियमितपणे भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन केले.

 691 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.