शिवसेनेचा डीएनए आणीबाणी समान

आमदार रविंद्र चव्हाण यांची  खरमरीत टीका  

डोंबिवली – युती तुटल्यावर सत्तेवर आलेल्या शिवसेनेवर भाजपाने टीका करणे सोडले नाही.भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत शिवसेनेचा`डीएनए`आणीबाणी समान असल्याची खरमरीत टीका केली आहे.१९७५ साली इंदिरा सरकारने लागू केलेल्या आणीबाणीला   शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला होता हे जनतेने विसरू नये असेहि आमदार चव्हाण यांनी सांगितले.    

भाजपा कल्याण जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, टिटवाळा या शहरांतील आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेल्या मान्यवरांचा कृतज्ञता म्हणून भाजप कडून सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चव्हाण बोलत होते.आणीबाणी विरोधी आंदोलनात सहभागी झालले शशिकांत कर्डेकर,विजय वेलणकर , मोहन दातार, श्रीराम देवस्थळी, सुधीर जोगळेकर  आणि  प्रकाश भुरके या कार्यकर्त्यांचा यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहीर देसाई, डोंबिवली पूर्व मंडळ महिला  मोर्चा  अध्यक्षा पूनम पाटील,मनीषा छल्लारे,मितेश पेणकर, प्रकाश पवार,माजी नगरसेवक मुकुंद ( विशू ) पेंडणेकर, निलेश म्हात्रे, संजीव बिरवाडकर, मनोज पाटील ,वर्षा परमार, आदि मान्यवर उपस्थित होते.

आमदार चव्हाण  म्हणाले,आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा दिला होता.लोकशाही टिकली पाहिजे यासाठी त्यावेळी ज्या संघटना,कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,समाजवादी आणि कम्युनिस्ट सहभागी होते.त्यानी २१ महिने तुरुंगवास भोगला होता.आणीबाणीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने मानधन देण्याची पद्धत सुरु केली होती.ती आता ठाकरे सरकारने बंद केल्याची खंत आमदार चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.या कार्यक्रमात सरचिटणीस अमृता जोशी आणि उपाध्यक्ष भारती तह्मनकार यांनी निवेदन केले.

 363 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.