कोरोनाचे भान सांभाळून साजरी केली वटपौर्णिमा

आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी महिला पूजा, उपवास करतात.मोट्या उत्साहात स्त्रिया हा सण साजरा करतात.   

ठाणे – वटपौर्णिमेला स्त्रियांमध्ये वेगळाच उत्साह असतो.हा सॅन स्त्रियांसाठी महत्वाचा असतो.  ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी २४ जून २०२१ रोजी वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेला सौभाग्यवती आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळावे यासाठी व्रत करतात. उपवास करुन वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा कोविडच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना गर्दी न करता उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे काही मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.   

पौराणिक कथेनुसार एक दिवस सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यासाठी जातो. सावित्री देखील त्यांच्यासोबत जाते. लाकडं तोडता तोडता सत्यवानला भोवळ येते आणि तो जमिनीवर पडतो. यमराज तिथे येऊन सत्यवानाचे प्राण नेत असतात आणि त्यांच्या मागे सावित्री चालू लागते. यम अनेकवेळा सावित्रीला परत जाण्यासाठी सांगत असतात परंतु सावित्री आपल्या पतीसोबतच जाण्याचा हट्ट धरते.   अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितले. तिसरे वरदान म्हणून तिने मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने नादात तथास्तू म्हटलं. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले.

 325 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.