कर्ण कर्कश्य आवाज असलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई 

ठाणे – ठाणे आयुक्तालयातील अनेक दुचाकीस्वारांनी त्यांच्या सायलेलन्सरमध्ये मॉडिफिकेशन केल्यामुळे निर्माण होणाऱ्या कर्णकर्कश आवाजाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नागरीकांच्या व लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने त्यांचेवर कडक कारवाई करण्याचे आदेश मा.पोलीस आयुक्त श्री जयजित सिंग यांनी दिलेले आहेत. त्याअनुषंगाने  ठाणे शहरात गेल्या आठवडयात अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. याच कारवाईच्या अनुषंगाने उल्हासनगर व विठ्ठलवाडी येथे जोरदार कारवाई करण्यात आली असुन एकुण 159 मॉडीफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या  दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन (या मध्ये RTO विभाग ठाणे यांच्याकडुनही दंडात्मक कार्यवाही करन्यात आली आहे,)त्यापैकी 114 मॉडीफाईड सायलेन्सर तात्काळ काढून घेवुन नष्ट करण्यात आले आहे. या कार्यवाहीत निष्पन्न झालेल्या वाहन चालकांना त्यांनी ज्या ठीकाणाहुन/गॅरेज मधून किंवा ज्या मॅकेनिक कडून असे बदल केलेले सायलेन्सर लावले आहेत त्या मॅकेनिकला किंवा संबंधितांना १९८ मो व का अन्वये कार्यवाही करन्यात येत आहे. तसेच ज्या ठिकाणी असे सायलेन्सर तयार होतात त्या ठिकाणीही कायदेशिर कार्यवाही करन्यात येत आहे. अशा प्रकारची कारवाई ही यापुढेही संपुर्ण ठाणे शहरात तीव्रतेने चालु राहणार असुन दुचाकीस्वारांनी अशा प्रकारचे मॉडीफाईड सायलेन्सरचा वापर करणे तात्काळ बंद करावे असे आवाहन ठाणे वाहतुक शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.  

 479 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.