ठाणे – ठाणे मुंबई वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून रेल्वे पुलाच्या जागी ठाणे मुंबईला जोडणारा नवीन पूल तयार करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पुलाला उद्घाटनापूर्वी तडे गेले असून निकृष्ट दर्जाचे कामाविरोधात मनसेने आज आंदोलन करत पुलाचे उद्घाटनहोऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
मनसेने आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि राज्य सरकारच्या विरोधात टाळ, मृदुंग आणि ढोलकी वाजवत आंदोलन केले. कोपरी पूलाला तडे गेल्याने हा पूल धोकादायक झाल्याचे मनसेने निदर्शनात आणले. या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि मनसे पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान, या पुलाबाबत कारवाई होईपर्यंत पुलाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असे आंदोकांनी सांगितले. या आंदोलातील ५० ते ६० मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
476 total views, 1 views today