पावसाची दमदार हजेरी

सखल भागात साचले पाणी

ठाणे  – ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने गुरुवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. ठाण्यात दुपारीनंतर पावसाने जोर धरल्याचे दिसून आले. त्यामुळे सांयकाळपर्यत १२७.४६ मीमी पावसाची नोंद झाली. तर शहरातील विविध सखल भागात पाणी साचल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले. तर शहरातील पाच ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.  वर्तक नगर भागात घराची शेड कोसळल्याची घटना घडली आहे. यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.


गुरुवारी ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर शहरावर काळे ढग दाटून आले होते. सकाळच्या सत्रत म्हणजेच दुपारी दिड वाजेर्पयत ३० मीमी पावसाची नोंद झाली होती. परंतु दुपार नंतर पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे दिसून आले. दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरातील नेहमीच्याच सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. वंदना, राम मारुती रोड, महापालिका मुख्यालयासमोरही पाणी साचले होते. तसेच कोपरीतील लवकुश सोसायटी परिसरात पाणी साचले होते, तर्फे पाडा, पुष्पांजली रेसिडेन्सी परिसर, जग्गनाथ भगीरथ सोसायटी आदींसह इतर सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेच्य माध्यमातून येथील पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावण्यात आले होते. तर शहरातील पंचशील अर्पामेंट मुंब्रा, कलेक्टर बंगला परिसर कोपरी, साईबाबा विहार कॉम्पलेक्स घोडबंदर, वृदांवन सोसायटी बस स्टॉप आदी ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच बारा बंगला परिसरात वृक्षाची फांदी पडल्याची घटना घडली. याशिवाय शहरातील तीन ठिकाणी वृक्ष धोकादायक अवस्थेत असल्याच्या तक्रारी ठाणो महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाल्या. दुपारनंतर शहरात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. दुपारी दिड वाजेर्पयत ३० मीमी पावसाची नोंद शहरात झाली होती. परंतु सांयकाळी साडेपाच र्पयत शहरात १२७.४६ मीमी पावसाची नोंद झाली आहे. सांयकाळी देखील पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.

 617 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.