जय झुलेलाल ट्रस्टचे लसीकरण शिबिर यशस्वी
ठाणे – कोपरी परिसरात झालेल्या कोरोनाच्या पहिल्याच लसीकरण शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जय झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मंगला हिंदी हायस्कूल येथे झालेल्या शिबिरात १ हजारांहून अधिक नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतला.
कोपरी परिसरातील १८ ते ४४ वयोगटातील तरुणाईबरोबरच नागरीक लसीकरणापासून वंचित होते. ते लक्षात घेऊन जय झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्टने लक्ष्मण टिकमानी यांच्या नेतृत्वाखाली मंगला हायस्कूलमध्ये शिबिर भरविले. या शिबिरासाठी भाजपाच्या ठाणे शहर आर्थिक प्रकोष्टचे प्रमुख सी. ए. विनोद टिकमानी व भाजपाचे कार्यकारिणी सदस्य विकी टिकमानी यांनी नियोजन केले होते. त्यातून सुमारे १ हजारांहून अधिक नागरीकांना लस देण्यात आली. या शिबिरासाठी आशा कॅन्सर सेंटर व चाईल्ड फर्स्ट यांनी साह्य केले होते.
आओ साथ मिलकर जीते जंग कोरोना से, हे ब्रिदवाक्य ठेवून जय झुलेलाल ट्रस्टच्या वतीने लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात अवघ्या काही तासांतच १ हजार नागरीकांची नोंदणी झाली. त्यांना नियोजनबद्ध पद्धतीने कोरोना लस दिली गेली. यापुढील काळातही ट्रस्टतर्फे विधायक उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सी. ए. विनोद टिकमानी व विकी टिकमानी यांनी सांगितले. या शिबिराच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदिप लेले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
390 total views, 2 views today