युनियन बँक ऑफ इंडिया ठाणे क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कोविड-19 लसीकरण कार्यक्रम संपन्न
ठाणे – `मिशन 100 टक्के लसीकरण ठाणे क्षेत्र’ या मोहिमेंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया ठाणे क्षेत्रीय कार्यालय, मुंबई-ठाणे च्या वतीने बँक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबिय सदस्यांसाठी कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धीविनायक हॉस्पिटल, ठाणेच्या वतीने सदर कार्यक्रम गोकुळ नगर शाखेत संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई-ठाणे क्षेत्र प्रमुख रेणु के. नायर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अमोल गीते, उप अंचल प्रमुख डी. राजेश्वर तसेच ठाणे क्षेत्र शाखाप्रमुख आणि कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय सदस्य उपस्थित होते.
बँक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबिय सदस्यांना कोविड-19 या महामारी पासून वाचविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय सदस्य यांच्याबरोबरच युनियन बँक ऑफ इंडियाचे केंद्रीय कार्यालय, विविध क्षेत्रीय कार्यालय येथील सदस्य मिळून 300 पेक्षा जास्त जणांनी या लसीकरण सुविधेचा लाभ घेतला.
युनियन बँकेचे मुंबई-ठाणे क्षेत्र प्रमुख श्रीमती रेणू के. नायर यावेळी म्हणाल्या की, कोविड या महामारीपासून कर्मचाऱयांचे जीवन रक्षण करणे ही आमची प्राथमिकता आहे. या अभियानाची सुरूवात आम्ही बँकेचे कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना लसीकरण करून केली आहे.
477 total views, 1 views today