जिल्ह्यात ३५१ नवे रुग्ण; तर २३ रुग्णांचा मृत्यू

 
ठाणे – ठाणे जिल्ह्यात सोमवारी ३५१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २५ हजार ४८८ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार २९९  झाली आहे.

ठाणे शहर परिसरात ७० रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३१ हजार ७६४  झाली आहे. शहरात ४ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ९४६ झाली आहे. तर कल्याण – डोंबिवलीत ८८ रुग्णांची वाढ झाली असून २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ६५ रुग्णांची वाढ झाली असून ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ७ रुग्ण सापडले असून एका मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत ७ बाधीत असून १ मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये ५६ रुग्ण आढळले असून २ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १० रुग्ण आढळले असून १ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये ११ रुग्णांची नोंद असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ३७ नवे रुग्ण वाढले आहेत. तर १ जणाच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३८ हजार ३६९ झाली असून आतापर्यंत ११२८ मृत्यूंची नोंद आहे.

 466 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.