आर.टी.ई. प्रवेश ३० जून २०२१ पर्यंत निश्चित करावा संतोष भोसले याचे आवाहन

ठाणे – वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ 1 ली ते 8 वी पर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी 25 टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते . जिल्हयातील पाच तालुके व सहा म.न.पा.तील आर.टी.ई. 25% प्रवेशासाठी दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी लॉटरीची  प्रक्रीया राज्यस्तरावरून पुर्ण करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण ९०८८ अर्जांची निवड झाली आहे. आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे त्यांनी संबधित शाळेत जाऊन दिनांक ३० जून २०२१ पर्यंत प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) संतोष भोसले यांनी केले  आहे.

निवड झालेल्या बालकांना शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जगानुसार पालकांना एस. एम. एस (SMS) द्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल परंतू पालकांनी फक्त एस. एम. एस (SMS) वर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी  पालकांनी गर्दी करू नये. सर्व शासकीय नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये. प्रतीक्षा यादीतील(waiting list) बालकांच्या पालकांनी सध्या शाळेत जाऊ नये.

पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे 

अ ) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
ब) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment Letter ) ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.

 378 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.