ठाणे मध्यवर्ती कारागृहातील 108 कैद्यांचे तर मेंटल हॉस्पिटलमधील 100 मनोरुग्णांचे लसीकरण पूर्ण
ठाणे – ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे मध्यवर्ती कारागृहातील 108 कैद्यांना तसेच मेंटल हॉस्पिटलमधील 100 मनोरुग्णांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. ठाणे महापालिकेच्यावतीने लसीकरण मोहिमेंतर्गत 45 वर्षावरील स्वतःचे आधारकार्ड तसेच इतर कोणतेही ओळखपत्र नसलेले ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैदी तसेच मेंटल हॉस्पिटलममधील मनोरुग्ण लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
425 total views, 2 views today