8 ते 44 या वयोगटाचे लसीकरण सुरू करण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला निर्देश

ठाणे –  शासनाच्या निर्देशानुसार मध्यंतरीच्या काळात 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली होती. या कालावधीत अनेक नागरिकांनी कोवॅक्स‍िनचा पहिला डोस घेतला असून त्यांचा दुसऱ्या डोससाठीचा 28 दिवसांचा विहित कालावधी उलटून गेला आहे, यासाठी 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुन्हा सुरू करावे असे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहे.

ठाणे सिव्हिल रुग्णालयाने सुद्धा 18 ते 44 या वयोगटाचे लसीकरण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने देखील या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करणेबाबत महापौरांनी प्रशासनाला निर्देश दिले आहे. 18 ते 44 या वयोगटातील बहुतांश नागरिकांनी कोवॅक्स‍िनचा पहिला डोस घेतला असून आयसीएमआरच्या नियमानुसार या नागरिकांना विहित मुदतीत म्हणजेच 28 दिवसांनी कोवॅक्स‍िनचा डोस घेणे गरजेचे आहे. सध्या ठाण्यात 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू नसल्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, दुसरा डोस मिळेल की नाही याबाबत भितीचे वातावरण आहे. तसेच लसीकरण कधी सुरू होणार याबाबत सातत्याने नागरिक विचारणा करीत आहे.

वय वर्षे 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस दिल्यास त्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल व आपले लसीकरणाचे उद्दिष्ट देखील पूर्ण होण्यास मदत होईल, या सर्व बाबींचा विचार करुन महापालिकेने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु करणेबाबत लेखी निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी  महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांना दिले आहेत.

 305 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.