आ. संजय केळकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

ठाणे – कोरोना काळात ठाणे शहरात तसेच आजुबाजुच्या उपनगरांमध्ये रुग्णांना ने – आण करण्यासाठी रुग्णवाहिकांची मोठी चणचण भासत होती. या पार्श्वभुमीवर आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने त्यांच्या संस्कार सेवाभावी संस्थे मार्फत ठाणेकरांसाठी अल्पदरात अंबुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा शनिवारी आ.केळकर यांच्या संपर्क कार्यालयाजवळ  करण्यात आला. माजी नगरसेवक बळीभाई नईबागकर, साईबाबा मंदिर वर्तकनगर व जय फाउंडेशनच्या वतीने या रुग्णवाहिका आ. केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी, साईबाबा मंदिराचे मिलिंद नईबागकर व जय फाउंडेशनचे धनंजय सिंग, विशाल वाघ, किरण धत्तूरे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, यापूर्वीही आ. केळकर यांनी आमदार निधीमधुन ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला रुग्णवाहिका दिली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट भयानक होती. कोविड आजारावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणा हतबल ठरली होती. अनेकांना रुग्णवाहिका तसेच बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागली होती.

 रुग्णवाहिकेअभावी अनेकांना प्राणदेखील गमवावे लागले. या पार्श्वभुमीवर आ. केळकर यांनी संस्कार संस्थेच्या माध्यमातुन ठाण्यासाठी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. शनिवारी या दोन्ही रुग्णवाहिकाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आ.केळकर यांनी, शहरातील रुग्णांना या रुग्णावाहिकाची मदत होणार असुन आरोग्याच्या आणीबाणी प्रसंगी या रुग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

रुग्णवाहिकेसाठी खालील नंबर वर संपर्क करावा

8425935555 / 8080607888

 261 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.