ठाण्यात समन्वय प्रतिष्ठानच्या लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाण्यातील ३ हजार नागरिकांना लस

ठाणे – समन्वय प्रतिष्ठान व भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी ठाण्यातील एम. एच. हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही तासांतच तीन हजार नागरिकांची नोंदणी संपली. या नागरिकांना आजपासून लस देण्यास सुरुवात झाली. भाजपाचे कोकण प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण व आमदार संजय केळकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ठाणे शहरातील १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण ठप्प झाले होते. या पार्श्वभूमीवर समन्वय प्रतिष्ठान व आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने अपोलो क्लिनिकच्या सहकार्याने आजपासून तीन दिवसांचे लसीकरण शिबिर आयोजित केले होते. त्याचे उद्घाटन आज झाल्यानंतर लसीकरणाला सुरुवात झाली. या वेळी आमदार निरंजन डावखरे यांच्याबरोबरच प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजयजी वाघुले आदींची उपस्थिती होती.
ठाण्यातील नागरिकांचे नियोजनबद्ध लसीकरण केल्याबद्दल आमदार रवींद्र चव्हाण यांनी समन्वय प्रतिष्ठानचे कौतूक केले. तसेच पुढील टप्प्यात भाजपाच्या वतीने ठाण्यातील आणखी नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
कोविशिल्ड लसीची खासगी हॉस्पिटलमधील किंमत प्रती डोस १ हजार रुपये आहे. मात्र, सीएसआर माध्यमातून २०० रुपयांची सवलत देऊन ८०० रुपये आकारले जात आहेत. या शिबिरासाठी नोंदणी खुली झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ती संपुष्टात आली, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

 739 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.