ठाणे जिल्हा परिषदेने केले १० लाख रक्कमेचे सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचे संकलन

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी धनादेश केले सुपूर्द

 ध्वजदिन निधी संकलनाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य

ठाणे – जिल्हा परिषदेच्या वतीने  १० लाख रक्कमेचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे आज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सुपूर्द केला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार, सहाय्यक प्रशासन अधिकारी दिलीप भराडे उपस्थित होते.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी सन २०२० करिता ठाणे जिल्हा परिषदेला निधी संकलनाचे १० लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्यातून १० लाख  रुपयाचा निधी संकलित करण्यात आला. अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ) अजिंक्य पवार यांनी दिली.

विभागनिहाय निधी संकलन

सामान्य प्रशासन विभाग  ९५,०००/-
आरोग्य विभाग / NRHM १,५५,०००/-
वित्त विभाग १०,०००/-
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग १३,०००/-
समाजकल्याण विभाग १,०००/-
महिला बाल विकास विभाग १७,०००/-
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ३,०००/-
शिक्षण विभाग ( प्राथमिक ) ६,६०,०००/-
शिक्षण विभाग ( माध्यमिक ) ५,०००/-
कृषी विभाग १०,०००/-
ग्रामपंचायत विभाग / मनरेगा २,०००/-
लघुपाटबंधारे विभाग ६,०००/-
बांधकाम विभाग २३,०००/-
एकूण –  १०,००,०००/-

महाराष्ट्र शासनास युद्धविधवा/ माजी सैनिकांच्या विविध कल्याणकारी योजन राबविण्यासाठी लागणारा निधी गोळा करून या राष्ट्र बांधणीच्या कार्यात आपण  व आपले कर्मचारी सहभागी होवून ध्वजदिन निधी संकलन मोहिमेत आपले बहुमुल्य  योगदान देवून आपल्या कार्यालयास दिलेला इष्टांक १०० टक्के  पूर्ण केल्या बद्दल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त केले.

माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात ७ डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो व त्या निमित्ताने ७ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेर पर्यंत निधी गोळा केला जातो.भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले,अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो.

 280 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.