ठाणे – ठाण्यात धनगर प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अगदी साध्या पारंपरिक पद्धतीने साजरी करत सफाई कर्मचार्यांना स्टीमर वाटप करण्यात आले.
३१ मे रोजी दरवर्षी धनगर प्रतिष्ठान,ठाणे व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत परंतु यावर्षी कोरोनाच्या संसर्ग लक्षात घेता. शासनाच्या नियमांचे पालन करून धनगर प्रतिष्ठान,ठाणे व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून सफाई करणारे सफाई कामगारांना स्टीमर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मासुंदा तलाव परिसरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, धनगर समाजाचे नेते,शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकरभाई वीरकर, एसआरए उपजिल्हाधिकारी वैशाली लांबते, कळवा हॉस्पिटलच्या माजी अधिष्ठाता संध्या खडसे,आदीवासी विकास विभागाचा प्रोजेक्ट अधिकारी तेजस्विनी गलांडे,दुय्यम निबंधक अधिकारी शाम दडस,आदिवासी विभाग सहाय्यक एज्युकेशन प्रोजेक्ट अधिकारी अभय कुमार गोवेकर, एसटी विभाग डीसी भालेराव, वाहतूक अधिकारी बांदल,ऍड नानासाहेब मोटे, डॉ अरूण गावडे,ज्ञानपीठ विद्यालयाचे विश्वस्त संतोष दगडे, संस्थेचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,महिला अध्यक्षा माधवी बारगीर आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी सुमारे १०० सफाई कर्मचार्यांना स्टीमर वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड,उपाध्यक्ष संतोष बुधे,खजिनदार अविनाश लबडे,उपसचिव तुषार धायगुडे,कार्यकारणी सदस्य दीपक झाडे,सुरेश भांड,प्रसाद वारे,उत्तम यमगर,संदीप धायगुडे,सल्लागार मनोहर वीरकर,महिला मंडळ सचिव गायत्री गुंड,उपखजिनदार संगीता खटावकर,सदस्य सुषमा बुधे,सुजाता भांड,आदीने मेहनत घेतली.
421 total views, 2 views today