मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोल्डन डाईन जंक्शन या मार्गावर आजपासून परिवहनची बससेवा सुरू

ठाणे – मुंब्रा-कौसा ते माजिवडा  या मार्गावर परिवहनची बससेवा सुरू करावी अशी मागणी सातत्याने या मार्गावरील प्रवाशांकडून होत होती. या मार्गावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेवून त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्यावतीने उद्या (1 जून 2021) पासून मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोलडन्‍ डाईज जंक्शन (माजिवडा नाका) मार्ग क्रमांक 142 या मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. तरी प्रवाशांना या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.
मुंब्रा-कौसा, माजिवडा परिसरातील प्रवाशांच्या मागणीनुसार मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोल्डन डाईज जंक्शन या मार्गावर प्रायोगिक तत्वावर बससेवा सुरू केली जाणार आहे. या मार्गावर खालीलप्रमाणे बसफेऱ्या सुरू करण्यात येणार आहे.
गोल्डन डाईज जंक्शन (माजिवडा नाका) ते मुंब्रा पोलीस स्टेशन मार्ग क्र. 142 वर एकूण 24 बसफे-या असणार आहेत. 06.35, 07.05, 07.35, 08.05, 08.35, 09.05,10.05,10.35,11.15, 11.45, 12.25, 12.55, 14.00, 14.30, 15.00, 15.30, 16.00, 16.30, 17.40, 18.10, 18.50, 19.20, 20.00, 20.30 या वेळेत या बसफे-या धावतील.
तर मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोल्डन डाईज जंक्शन (माजिवडा नाका) मार्ग क्र. 142 वर एकूण 24 फेऱ्या असणार आहेत. 07.05, 07.35, 08.05, 08.35, 09.05, 09.35, 10.40, 11.10, 11.50, 12.20, 13.00, 1330, 14.30, 15.00, 15.30, 16.00,16.35, 17.05, 18.15, 18.45, 19.25, 19.55, 20.35, 21.05 या वेळेत धावणार असून प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे. 

 423 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.