भटक्या श्वानांचे लसीकरण

ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्यावतीने ५०० श्वानांचे लसीकरण

ठाणे – जिल्ह्यात भटक्या श्वानची दहशत वाढत असल्यामुळे गेल्या वर्षभरात शहरात साडेचार हजार जणांना चावा घेतल्याची नोंद जिल्हा रूग्णालयात आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात भटक्या श्वानची संख्या झपाट्याने वाढू लागली असून ही एक मोठी समस्या बनली आहे. भटक्या श्वानांना लस टोचली जात नाही किंवा त्यांना पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस टोचण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्या वतीने शहरातील ५०० श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
ठाण्यात सुमारे ७० हजार हून अधिक भटके श्वान असून त्यापैकी महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाने२०१४ ते १९ य वर्षात ५८ हजारहून अधिक श्वानांवर नसबंदी केली आहे. मात्र तरीही शहर परिसरात भटक्या श्वानांची दहशत वाढत आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाच्या वतीने ही मोहीम न घेतल्यामुळे बऱ्याच श्वानांचा रेबीजमुळे मृत्यूदेखील झालेला आहे. भटक्या श्वानांना लस टोचली जात नाही किंवा त्यांना पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस टोचण्यासाठी पुढे येत नाही. ही मोहीम प्रशासनाच्या माध्यमातून राबविली जात नसल्यामुळे मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीने ही मोहीम  शहरात राबविण्यात आली. ही मोहिम शहरातील वसंत विहार, हिरानंदानी मेडोज, कळवा, खारेगाव, लोकमान्य नगर, नौपाडा, जांभळी नाका, घोडबंदर रोड या सर्व परिसरात राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ५०० श्वानांना अँटी रेबीजचे लसीकरण करण्यात आले तसेच लहान पिल्लांना नाईन इन  वन ची लसीकरण देण्यात आली, जेणेकरून त्यांना गॅस्ट्रो व डिस्टेंपर सारखे आजार होणार नाही.
दरम्यान या मोहिमेअंतर्गत श्वान यांना त्यांच्या गळ्यात रेडियम ची बेल्ट देखील घालण्यात आलेले आहेत. जेणेकरून अंधारात त्यांचा अपघात होऊ नये. तसेच अपघातुळे मृत्यू होणाऱ्या श्वानाचे प्रमाण कमी होईल. दरवर्षी भटक्या श्वानांचा चावा घेतल्याच्या अनेक घटना घडतात, मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्यावतीने ५०० श्वानांचे लसीकरण केले.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पालिकेमार्फत भटक्या श्वानांचे लसीकरण पुन्हा सुरू व्हावे.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे भटक्या प्राण्यांसाठी असणारे निर्जंतुकीकरण केंद्र जे गेल्या दोन वर्षापासून बंद आहे ते महानगरपालिका प्रशासनाने त्वरित सुरू करावे, जेणेकरून श्वानांची वाढणारी संख्येवर निर्बंध ठेवण्यात येऊ शकेल अशी स्वप्नील महिंद्रकर यांची मागणी आहे.

 392 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.