जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण   

जल जीवन मिशन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरपंच, समिती सदस्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे  (ऑनलाईन) प्रशिक्षण

योजनेची अंमलबजावणी, देखभाल दुरुस्ती आणि सनियंत्रण करण्याचे देण्यात आले प्रशिक्षण

ठाणे  – ग्रामीण कुटुंबांना सन २०२४ अखेर खाजगी नळाव्दारे पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवनमिशन कार्यक्रमाच्या अंमलबजवाणीस सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात ही  योजना राबवली जात आहे. त्यानुषंगाने गावपातळीवर  या योजनेच्या  व्यवस्थापनाची जबाबदारी ही ग्रामपंचायत आणि समित्यांची आहे. त्यामुळे गावपातळीवर सुरक्षित आणि शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुरूप नियोजन, अंमलबजावणी, देखभालदुरुस्ती आणि सनियंत्रण करण्यासाठी विविध उपक्रमांची निश्चिती करणे महत्वाचे आहे. यासाठी आज शंभर टक्के नळ जोडली झालेल्या ४२ ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य, ग्राम पोषण आहार समितीचे सदस्य व गावातील ५ महिलांना  व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून (ऑनलाईन) प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणाचे प्रास्तविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता) छायादेवी शिसोदे यांनी करून जिल्ह्यातील कामाची स्थिती अधोरेखित केली. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हिरासिंग भस्मे यांनी जल जीवन मिशन उद्दिष्टे, नियम, कार्यपद्धत, जिल्ह्याची सद्यस्थिती व आव्हाने तसेच पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्ती व पाणीपट्टी खर्चाचे अंदाजपत्रक याविषयी मार्गदर्शन केले. तर राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागचे विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे यांनी लोकसहभागाचे महत्व, त्याच्या कार्यपद्धती (PRA & ODEP) याबाबत संविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अमरावती येथील जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील पाणी गुणवत्ता सल्लागार  नीलिमा इंगळे यांनी एफ टी के किट  ओ. टी टेस्ट तपासणी, खाजगी व सार्वजनिक स्त्रोतांची स्वच्छता व जलसुरक्षक यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले. भूजल व सनियंत्रण विभागाचे कनिष्ठ भूवैज्ञानिक श्रीम. बोरकर मॅडम यांनी पाण्याचे अंदाजपत्रक, भूजल अधिनियम व वर्षा जलसंधारण कायदा याविषयी मार्गदर्शन केले तर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील मनुष्यबळ विकास सल्लागार  ज्ञानेश्वर चंदे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या तसेच समितीची संरचना याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अनिल निचिते यांनी केले. यावेळी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी, अतिरिक्त गट विकास अधिकारी, उपअभियंता, तालुका संपर्क अधिकारी, विस्तार अधिकारी, गट समनव्यक व समूह समनव्यक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी पार पडला.

 235 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.