“माझं कुटूंब माझी जवाबदारी” जाहिरातबाजीला मनसे व सामाजिक संघटनेचा विरोध

ठाणेआयजीच्या जीवावर बायजी हुशार बायकोच्या पदावर नवरा सुभेदार !  सध्या या नवीन म्हण ठाण्यात बोलली जात आहे. कारणही तसंच आहे. निवडणुकी दरम्यान ज्यांना तिकीट मिळावी म्हणून प्रयन्त केला गेला परंतु महिला आरक्षण अभावी हे तिकीट त्यांच्या पत्नीच्या नावे घेऊन निवडुणका लढवल्या गेल्या. निवडून आल्यावर आपणच नगरसेवक असल्याच्या थाटात फिरत असत. आता मात्र या गोष्टीचा कहर झाला आपणच या नगराचे मालक असल्याच्या जनतेच्या पैश्यांवर नगरात बॅनर बाजी केली जात आहे.   कोरोना काळात एकीकडे मुख्यमंत्री ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ अशी भावनिक साद घालत नागरिकांना घातली. मात्र ठाणे शहरातील शिवसेनेच्या शिलेदारांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलत “माझे कुटूंब माझी जवाबदारी” जाहिरातबाजीत चक्क आपल्या नातेवाईकांचे फोटो झळकावले आहेत.  प्रभाग क्रमांक ५ आणि ७ मधील शिवसेना नगरसेविकांच्या पतीचे फोटो या डिजिटल बॅनरवर दिसत असून जनतेच्या कररूपी पैशांवर सुरु असलेली ही चमकेशगिरी तात्काळ थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह या भागातील सामाजिक संघटनांनी  केली आहे.

ठाणे पालिकेच्या तिजोरीत आधीच खडखडात असताना प्रभाग सुधारणा निधीचा बिनदिक्कतपणे अपव्यय सुरु असल्याची बाब समोर आली आहे. प्रभाग क़्र. ५ मध्ये संस्कार पब्लिक शाळेजवळील शिवाईनगर नगरच्या स्वागताचा बोर्ड व प्रभाग क़्र ७ मध्ये वर्तकनगरात डिजिटल बोर्ड उभारण्यात आले आहेत. या फलकांवर वर्तकनगर येथे शिवसेना नगरसेविका राधिका फाटक यांचे पती राजेंद्र फाटक आणि शिवाईनगरात शिवसेनेच्या नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांचे पती भास्कर बैरीशेट्टी यांची छबी झळकली आहे. नगरसेविकेचे पती हे कोणत्याही प्रशासकीय हुद्यावर अथवा स्वत: नगरसेवक नाहीत. त्यांचा फोटो कोणत्या हेतूने जाहिरातीत लावला आहे यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ आहे का? असा प्रश्न मनसेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख याना केला आहे.

 246 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.