“मॅन ऑफ दी मॅच” राष्ट्रवादी काँगेस कडून मोदीसरकारला  शुभेच्छा देऊन निषेध  

पेट्रोलची शंभरी मोदी सरकार मॅन ऑफ दी मॅच राष्ट्रवादीने ठाण्यात झळकवले फलक 

ठाणे –  भाजपच्या सत्ता काळात इंधन दरवाढीचा आलेख चढाच राहिला आहे. मे महिन्यामध्ये सुमारे १४ वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे फलक सबंध ठाणे शहरात लावले आहेत. या फलकांवर अच्छे दिनाच्या शुभेच्छा देऊन  मोदी सरकारला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला आहे.
 देशात पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये या महिन्यातील ४ तारखेनंतर आज चौदावी दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ठाणे- मुंबईत पेट्रोलनं शंभरी गाठली आहे.   डीझेलची किंमत २९ पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. ठाणे- मुंबईत पेट्रोल आज १००.४ रुपये आणि ९१.८७ रुपये प्रति लिटर आहे.  याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत. सबंध ठाणे शहरात लावण्यात आलेल्या या फलकावर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून त्याने शतक पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. “ मॅन ऑफ दि मॅच; पेट्रोल १०० नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा” असा संदेशही या फलकांवर लावण्यात आला आहे. या फलकांची ठाणे शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष माजि . खा. आनंद परांजपे यांनी सांगितले की, गेले काही दिवस सातत्याने इंधनाचे दर वाढत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीचा निषेध करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध ठाणे शहरात फलक लावले आहेत. त्यावर एक बॅट्समॅनचे चित्र आहे. त्याला आम्ही मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार दिला आहे.  त्यावर शंभरी पार केल्याबद्दल अच्छे दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते  “ बहुत हुई महँगाई की मार, अब की बार मोदी सरकार” असे ओरडत होते. मात्र, आता त्यांच्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक झाला आहे.  यूपीएच्या काळात पट्रोल-डिझेल कधीच एवढ महाग झाले नव्हते. त्यामुळेच केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत.

 258 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.