ठाणे – ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ८२२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख १३ हजार ५४८ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ५२ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ९ हजार ६१ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात १५४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २८ हजार ४३७ झाली आहे. शहरात ७ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ८७७ झाली आहे. तर कल्याण – डोंबिवलीत १९९ रुग्णांची वाढ झाली असून २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ९५ रुग्णांची वाढ झाली असून ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ५३ रुग्ण सापडले असून मृत्यूची नोंद झाली नाही. भिवंडीत ७ बाधीत असून मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये १३९ रुग्ण आढळले असून ०४ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये २० रुग्ण आढळले असून ०२ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाली आहे. तर ०३ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ११५ नवे रुग्ण वाढले आहेत. तर ०७ जणाच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३५ हजार ३३ झाली असून आतापर्यंत ८६० मृत्यूंची नोंद आहे.
434 total views, 1 views today