लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही. याबाबचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन घेतील अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्यात जवळपास महिनाभर कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी राज्यातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवला जाणार नाही. पण वेळोवेळी परिस्थिती पाहून लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. २१ जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे, अशाठिकाणी बेड उपलब्धता हा प्रश्न असतो. त्यामुळे एक नक्की आहे की सरसकट लॉकडाऊन उठवणार असा विषय नाही. लॉकडाऊन जो आज आहे. तो कायम ठेवून त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. त्यामध्ये मग वेळेची मर्यादा किंवा अन्य बारकाव्यांवर स्वतंत्र चर्चा केली जाईल. त्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल’, अशी माहिती टोपे यांनी दिलीय.
टप्याटप्याने लोक डाऊन शिथिल होणार – विजय वडेट्टीवार
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हणाले , लॉकडाऊनमधून सूट देताना ३ ते ४ टप्प्यांत दिली जाईल. रेड झोनमधील गावांबाबत सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. ज्या जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे थोडी सवलत द्यावी, असा विचार आहे. तसेच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी करावा आणि शिथीलता द्यावी असा सरकारचा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
481 total views, 1 views today