प्रभाग ७६ मध्ये पांडुरंग आमलेंच्या र्निजंतुकीकरण मोहीमेचा धडाका कायम

गेल्या काही महिन्यापासून प्रभागाच्या कानाकोपऱ्यात कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर र्निजंतुकीकरण राबवली आहे मोहीम
नवी मुंबई : सानपाडा, प्रभाग ७६ मध्ये कोरोना महामारीच्या काळात भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमलेंच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये र्निजंतुकीकरण मोहीमेचा (सॅनिटायझेशन) धडाका आजही कायम आहे. बुधवारी पांडुरंग आमलेंनी प्रभाग ७६ मधील चार गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये र्निजंतुकीकरण मोहीम राबविताना ‘मी नाही तर माझी कामे बोलतात’ याचा प्रत्यय स्थानिक जनतला कृतीतून पुन्हा एकवार दाखवून दिला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सानपाडा प्रभाग क्रमांक ७६ बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार पांडुरंग आमले गेल्या काही महिन्यापासून प्रभागाच्या कानाकोपऱ्यात कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर र्निजंतुकीकरण मोहीम राबवित आहेत. बुधवारी प्रभाग ७६ मधील प्रियांका, स्वस्तिक, छाया व स्वस्तिक, नर्मदा या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पांडुरंग आमले यांनी स्वत: ही र्निजंतुकीकरण मोहीम राबविली. यावेळी
यावेळी या चार सोसायटीचे पदाधिकारी सोनी, वाव्हळ, नाना शिंदे, निंबाळकर,जाधव, सोनावणे, पवार, इंगवले, मालपोटे, मोहन यादव, युवराज जाधव, बावकर यांच्या उपस्थितीत निर्जंतुकीकरण पार पडले. यावेळी स्वतः पांडुरंग आमले, रमेश शेटे, पंकज दळवी, सुनील नाईक साहेब, सरनोबत व साईभक्त परिवारातील युवा वर्ग उपस्थित होता. या सर्व सोसायटीचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी तसेच रहीवाशांनी पांडुरग आमले यांचे आभार मानून कोरोना महामारीच्या काळात ते सातत्याने करत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

 291 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.