ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे येथील पंपिंग मशीनचे  पावसाळयापुर्वी देखभाल दुरुस्तीची काम हाती घेतल्यामुळे शुक्रवार दिनांक २८ मे २०२१ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.        

शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख.गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, मानपाडा, कोठारी कंम्पाउंड, पवार नगर, आझाद नगर, साकेत, रुतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, ईटरनिटी, समता नगर या भागात सकाळी ९ .०० ते संध्याकाळी ९.०० वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.        

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा  होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 314 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.