जिल्ह्यात ८२६ नवे रुग्ण; तर ५२ रुग्णांचा मृत्यू

ठाणे – ठाणे जिल्ह्यात सोमवारी ८२६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख १० हजार ८०५ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ५२ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ८ हजार ९२३ झाली आहे. तर, कल्याण डोंबिवलीत दिवसभरात सर्वाधिक २२८ रुग्णांची नोंद झाली असून सर्वात जास्त २३ हा मृतांचा आकडाही तेथेच आहे अशी माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
     ठाणे शहर परिसरात १२७ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २७ हजार ९६९  झाली आहे. शहरात ४ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ८६० झाली आहे. तर कल्याण – डोंबिवलीत २२८ रुग्णांची वाढ झाली असून २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ९४ रुग्णांची वाढ झाली असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये १३ रुग्ण सापडले असून एक मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत १६ बाधीत असून ०१ मृत्यूची नोंद आहे.  मीरा भाईंदरमध्ये १४९ रुग्ण आढळले ०५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत. बदलापूरमध्ये ४१ रुग्णांची नोंद झाली असून तर १० जण दगावल्याची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये १२५ नवे रुग्ण वाढले आहेत. तर ०३ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३५ हजार ३२९ झाली असून आतापर्यंत ८४९ मृत्यूंची नोंद आहे.

 422 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.