ठाणे – ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेट क्रमांक दोन येथील बाहेरील रस्त्यावर उभी केलेल्या शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या इंनोव्हा करिस्ट या चारचाकी गाडीसह एका रिक्षावर झाडाची फांदी तुटून पडल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
मुख्यालयाच्या बाहेर असलेल्या टीएमटी बस थांब्याजवळ नगरसेवक रेपाळे यांची गाडी उभी होती. तसेच तेथे हरिशंकर वर्मा यांनी रिक्षा उभी केली होती. त्याचदरम्यान अचानक महापालिकेच्या आवारातील झाडाची फांदी तुटुन त्या उभ्या केलेल्या वाहनांवर पडली. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, तातडीने ते झाड बाजूला केले. फांदी पडली तेंव्हा दोन्ही गाड्यांमध्ये कोणीही नव्हते. अशी माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
494 total views, 3 views today