राज्यात सर्वाधिक कोरोना लस कमी वाया जाण्याचे प्रमाण ठाणे महापालिकेचे

लसीचा पुरेपूर वापर  -२.५१ टक्के लस वाया

ठाणे – कोरोना प्रतिबंधक लसीकरणसाठी शासनाने उपलब्ध केलेल्या कोविशील्ड व कोवॅक्सिन या लसीच्या एकूण ३,४१,९५० लसीच्या डोसेसचा पुरेपूर वापर करून एकूण ३,५०,५२८ डोसेस लाभार्थ्यांना देण्यात आले असून यामध्ये फक्त -२.५१ टक्केच लस वाया गेली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या चोख नियोजनामुळे राज्यातील हे सर्वाधिक कमी कोरोना लस वेस्टेज जाण्याचे प्रमाण आहे.शासनाच्या मार्गदर्शन सुचेनानुसार महापालिकेच्यावतीने ५५ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.  सर्वच लसीकरण केंद्रात शिस्तबद्ध पद्धतीने लाभार्थ्यांना कोविडशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे.
दिनांक १६ जानेवारी २०२१ ते २० मे २०२१ पर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागास एकूण ३,४१,९५० डोसेस उपलब्ध करण्यात आले आहेत. या उपलब्ध डोसेसचा पुरेपूर वापर करून एकूण ३,५०,५२८ डोसेस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये उपलब्ध वाईल्समधून जास्तीत जास्त डोस देण्यात येत असून -२.५१ टक्केच लस वाया गेली आहे.आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर २३,४३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहिला तर १५,४२७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाइन कर्मचारी पैकी २४,१०४  लाभार्थ्यांना पहिला व १२,७१९ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून ४५ ते ६० वयोगटातंर्गत ८९,४१३ लाभार्थ्यांना पहिला तर २०,२९० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षावरील नागरिकांमध्ये  १,०७,८३४  लाभार्थ्यांना पहिला डोस व ४७,३९७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.तसेच १८ ते ४४ वयोगटामध्ये ९,९११ लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला असून एकूण ३,५०,५२८ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.दरम्यान लसीकरण संदर्भात काही शंका असल्यास किंवा लाभार्थ्यांना लसीच्या प्रमाणपत्राबाबत काही अडचण उदभवल्यास दुपारी १ .०० ते ५.०० या वेळेत ८४५१००८३२५ आणि ८४३३७९६७७० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 271 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.