7 वर्षाच्या हुनेन शेखने पूर्ण केले रमजान महिन्यातील कडक उपवास

ठाणे – महागिरी भागातील रशीद शेख यांचा मुलगा हूनेन रशीद शेख याने आपल्या आई वडिलांकडे हट्ट करून वयाच्या ७ व्या वर्षी रमजानच्या पवित्र महिन्याचे संपुर्ण ३० दिवस उपवास केले.
 एवढ्या लहान वयात रमजान महिन्यातील सतत ३० दिवसाचे कडक उपवास जमणार नाही म्हणून आई-वडीलानी हुनेनला सांगितले तरिही आपल्या आईवडिलांकडे हट्ट करून हे उपवास त्याने धरले,दोन तीन दिवसात तो आपला हट्ट सोडेल असे त्यांना वाटले पण हुनेनने हे उपवास सलग तीस दिवस पुर्ण केले व रमजान इद साजरी केली त्याचे परिसरातील सर्वानी कौतुक केले व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा वेगवेगळ्या वस्तू-चाॅकलेट बाॅक्सची इदि देऊन त्याचा सत्कार केला ठाणे जिल्हा इंटक काॅग्रेसचे अध्यक्ष सचिन शिंदे,भारतीय जनता पार्टीचे विशाल वाघ आदिनी त्याचा सत्कार करून कौतुक केले.

 287 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.